चिखली – परंपरा, संस्कृती आणि पर्यटनाचे केंद्र
शिराळा तालुक्याची नागपंचमी जगभर प्रसिद्ध आहे. श्रावण महिन्यात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात देशविदेशातून हजारो भाविक व पर्यटक येतात.
चिखली गावाचाही या ऐतिहासिक उत्सवात महत्त्वपूर्ण सहभाग असतो. नाग देवतेच्या पूजेची ही अनोखी परंपरा वर्षानुवर्षे अव्याहतपणे सुरू आहे.
शिराळ्याची अनोखी परंपरा – नागदेवतेची जिवंत पूजा
चिखलीचे ग्रामदैवत – धार्मिक व सांस्कृतिक जीवनाचे केंद्र
काळम्मादेवी हे चिखली गावाचे ग्रामदैवत असून मंदिर हे गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनाचे केंद्र आहे. येथे नित्य पूजा व वार्षिक जत्रा होते.
गावातील सर्व शुभकार्य देवीच्या आशीर्वादाने सुरू होतात. महिला व पुरुष दोन्ही भक्त मोठ्या श्रद्धेने येथे दर्शन घेतात.
१९४२ च्या भारत छोडो आंदोलनात मंगले सत्याग्रहात सहभाग. भारत सरकारतर्फे स्वातंत्र्यसैनिक म्हणून सन्मानित.
स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग व तुरुंगवास. नाईक सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक.
१९४२ च्या आंदोलनात सत्याग्रह व तुरुंगवास. भारत सरकारतर्फे स्वातंत्र्यसैनिक म्हणून सन्मानित.
चिखली गाव स्वातंत्र्यपूर्व काळातच अस्पृश्यता न पाळणारे राज्यातील एकमेव गाव म्हणून ओळखले जाते. सामाजिक समता, बंधुता आणि ऐक्य यांचे हे गाव आजही जिवंत उदाहरण आहे.